नाही थांबत मग जीव कुठे प्रिया
नाही थांबत मग जीव कुठे प्रिया
मनं सुटलंय रें सखा वाऱ्यावर
लावून हिरवं वृक्षात अडवना
प्रेमाच्या सावलीत येईल मी
मुळ्यामधी भरून पानी
या फांदीतुन त्या फांदीत
खेळून येतील सुखाच्या धारा
आनंदी आनंदाच्या फळामधी
मेघही मायेने भिजवून जातील तुला
प्रेमाच्या बंधनात जग चाललं
नको रें जाऊ वाळवंटात
झाकून चाल तन धरेचं
तिच खरी प्रेमाची आई
तयात बांधून ठेव नात आपलं
धूळ शेवट धुळीला मिळते रें
गुंतव जिव्हाळ्यात वृक्ष मनं
लावून मिळतो सुख सखा
हिरव्या बागेतच आहे खरा श्वास
नाही थांबत मग जीव कुठे प्रिया रें
