STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

4  

Manisha Awekar

Abstract

गोड बंधन राखीचे

गोड बंधन राखीचे

1 min
358

काळ कितीही बदलो

नवे युगांतर होवो

भाऊ - बहीण नात्याचे

प्रेम कालातीत राहो   (१)


नाते हळवे प्रेमाचे

बालपणी खेळकर

गप्पागोष्टी नि मस्करी

येई चेष्टेला बहर      (२)


राखी बंधन भावाला

करी औक्षण प्रेमानी

मंगलचिंतन मनी

फुले सहवासातूनी     (३)


भेट खास बहिणीला

भाऊ देई आठवाने

दिन आजचा प्रेमाचा

जाई हास्यविनोदाने     (४)


जरी भाऊ परदेशी

राखी पाहिल्यावरती

मनी आठव ताईचा

मग गप्पागोष्टी होती    (५)


नाते हळवे राखीचे

ऋणानुबंधांच्या गाठी

धागा रेशमी प्रेमाचा

खास गोड भावासाठी    (६)


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Abstract