STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

4  

Manisha Awekar

Abstract

नागपंचमी

नागपंचमी

1 min
385

सरसर येता श्रावणधारा

मन जाई बाळपणामधी

उत्सुक नजरा अधीरपणे

बघती मेंदी तळव्यावरची


गोडधोड भरगच्च खाऊनी

खेळायाला धावे सख्यांसवे

एनर्जी तर वाहे भरभरुनी

कसा सूर्य कलतो नकळे


आता पंचमी येते जाते

स्मरणही नसे घरी कुणा

बंदी घातली गारुड्यांना

मज्जाव मेंदी लावण्या


चिरणे तळणे तवा ठेवणे

सारे चालू असते आता

मनास माझ्या समजावते

खरे कालाय तस्मै नमः


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract