माझा पाऊस
माझा पाऊस
तुझ्या सरींत मी पावसा,
सांग कसे भिजावे?
आधीच ताज्या जखमा,
उगीच त्यांस ओले करावे
ह्या ओघळणार्या सरींत,
अश्रू माझ्या नभीचे.
ह्या दाटलेल्या मेघांत,
काहूर माझ्या वेदनांचे
गडगडणार्या आभाळी,
अस्तित्व माझे ओरडते
लखलखत्या वीजेत,
प्रतिमा माझी तराळते
मात्र श्रावणाचे तुझ्या,
मी गीत गात रहावे
मऊ उन्हाच्या सोबतीस,
सरींच्या सुराने यावे
