क्षितिज...
क्षितिज...
एकदा असंच,
मला वार्याने विचारलं.
उगीच पाहतेस वेडी स्वप्नं.
पाहिलंय का कधी,
जमीन अन् आभाळाचं एकत्र नांदनं.
मीही मग क्षितिजाचं उदाहरण,
अगदी शिताफीनं दिलं.
मग वार्यानेच हसून म्हणटलं,
क्षितिज फक्त दिसतं.
पण,ते कल्पनेतच असतं.
आपल्याच नजरेनं आपल्याला,
असं फसवलेलं असतं.
तेव्हा मात्र मनाला ,
अनामिक वेदनांनी घेरलं.
मग मीच मनातलं क्षितिज,
जवळ जाण्याआधीच पुसलं.

