चंद्र-चकोर
चंद्र-चकोर
1 min
342
चकोरापायी पानांच्या अडून,
चंद्राचं दिसणं होतं
मऊसुत वार्याला मात्र,
इर्ष्येने बाधलं होतं
चकोराचं नेत्रचांदणं,
चंद्रास भावलं होतं
लुकलुकणारं हे सुख,
वार्याला खुपलं होतं
चंद्राचं डगमगणं,
चकोराने पाहिलं
पानांच्या सळसळीचं,
लक्षातच नाही राहिलं
"कुठे बिनसलं?" ह्या प्रश्नात,
अवघ्या रात्रीस जागवलं
दोघांचं हे तजेल चांदणं,
शेवटी सुप्त होऊन निजलं...
