घाव...
घाव...
पाठीवरी माझ्या,
ही वेदनांची श्रृंखला.
हसू मागता मी,
आसू आले डोळा.
पुसता का मज,
नसे नाव गाव.
माझ्याच गावाने दिलेला,
माझ्या जिव्हारी घाव.
आपले जे म्हटले,
ते सारे तुटले.
कुण्या जन्माचे वैर,
आज इथे सजले.
अंती आता माझे,
नेमके काय उरले?
माझ्याच अंगणाने,
मज परके मानले.
