STORYMIRROR

Yogini "कृष्णाई"

Abstract Romance

4  

Yogini "कृष्णाई"

Abstract Romance

मैत्रीच्या पलीकडे

मैत्रीच्या पलीकडे

1 min
250

अनोळखी होतो आपण पण,

ओळखीपेक्षा जास्ती काही तरी होत...

मैत्री तर होती आपल्यात पण,

मैत्रीच्या पलीकडे काही तरी होत...


बंध होते काही वेगळे आपल्यात पण,

बंधना पलीकडे काही तरी होत...

जपणे होते प्रत्येक क्षणी पण,

काळजी पलीकडे काही तरी होत...


चुकलो आपण तर सावरणे होते पण,

सावरण्या पलीकडे काही तरी होत...

हरवणे होते एकमेकात पण,

शोधण्याच्या पलीकडे काही तरी होत...


हवीहवीशी वाटणारी साथ होती पण,

त्या साथ देण्याच्या पलीकडे काही तरी होत..

नातं होत आपल्यात पण,

त्या नात्याच्या पलीकडे काही तरी होते...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract