तू एकदा बोलायला ये..
तू एकदा बोलायला ये..
माझ्या स्वप्नांना हल्ली,
भावनांचा आडोसा लागतो,
भरलेल्या मनाने निजल्यावर,
ओल्या आठवणींचा पुरावा मिळतो...
आयुष्याच्या अशा वाटेवर सख्या,
तू मला सावरायला ये...
प्रत्येक शब्दांचा कानोसा घे सख्या,
तू एकदा बोलायला ये..

