STORYMIRROR

Yogini "कृष्णाई"

Abstract Romance

4  

Yogini "कृष्णाई"

Abstract Romance

दाराशी मी बसलेली

दाराशी मी बसलेली

1 min
299

दाराशी मी बसलेली,

वाट पाहत त्या सरीची,

पाऊस असा दाटूनी आला,

अकस्मात माझ्या घरावरी...


दरास भास अनामिक,

हळुवार अनोळखी पावलांचे,

कोरड्या अंगणात माझ्या,

बरसेल का पाणी या पावसाचे...


दरवळला सुगंध,

ओल्या मातीचा कुठून,

नजरेस पडला पाऊस तुझा,

मी ओली चिंब न भिजून...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract