आई आणि बाबा...
आई आणि बाबा...
आई-बाबा तुम्हा दोघांना,
नेहमी सोबत पाहिलंय,
सुख असो वा दुःख,
नेहमी मिळून झेलताना पाहिलंय...
छोट्या छोट्या आनंदाला,
तुम्हाला मिठी मारताना पाहिलंय,
मोठ्या संकटाना अगदी,
निर्धास्तपणे झेलताना पाहिलंय...
बाबा तुमच्यात संयम,
तर आई मधे सहनशक्ती पाहिलंय,
आम्हा मुलांना वाढवायला आईची मेहनत,
तर बाबांची मरमर पाहिलंय...
खचून गेलो आम्ही तर,
वर मान करून जगायला शिकवलंय,
हरलो आम्ही कधी तर,
पुन्हा आम्हाला जिंकायला शिकवलंय...
जीवन जगायचं कसं,
हे तुम्ही आम्हाला शिकवलंय,
सात जन्मी तुम्हीच आमचे पालक व्हावे,
म्हणून आम्ही देवाला हे मागितलंय...
