प्रिय भूतकाळ..
प्रिय भूतकाळ..
1 min
202
नको मला आता,
तुझ्यात गुंतून राहणे,
उगाच जुन्या जखमांना,
पुन्हा नको नव्याने पाहणे...
आहेस भूतकाळ,
भूतकाळ म्हणूनच रहा,
उगाच नको वर्तमानाला,
झालेल्या चुकांचा पहारा...
भविष्य माझे,
नको तुझ्यावर अवलंबून,
विसरायचे आहे तुला,
मग का येतोस आठवण होऊन...
चांगल्या गोष्टी तुझ्यातल्या,
मी ठेवते मनात जपून,
वाईट घडलेल्या गोष्टी मात्र,
तू ठेव तुझ्याकडेच लपून....
