STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

4  

Manisha Awekar

Abstract

माझ्या मनाचे आभाळ

माझ्या मनाचे आभाळ

1 min
294

माझ्या मनाचे आभाळ

येती सरींवर सरी

मिसळती किरणांची

लड तयात सोनेरी


फुले डौलामधे धनू

रंग खुलती अंबरी

मिळे धरेला अंबर

मन खुलते अंतरी


माझ्या मनाच्या आभाळी

येती काळ्या घनमाला

मोर फुलवी पिसारा

मोद होतसे मनाला


माझ्या मनाच्या आभाळी

ज्वालाग्राही तप्त झळा

मन पोळतसे माझे

दुःख वेदनांच्या कळा


असे मनाचे आभाळ

कधी हसते रडते

आसू हसूंचा संगम

हेच जीवन असते 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract