STORYMIRROR

ANJALI Bhalshankar

Action Inspirational Others

3  

ANJALI Bhalshankar

Action Inspirational Others

गुंतु नकोस भावा

गुंतु नकोस भावा

1 min
128

अजान नि चालीसात

गुंतु नको भावा

तुला शिवरायाची आन आहे

अज्ञानात जाशील चेतावणिला

भुलशील दंगे जाळपोळ करून

आपलयाच बांधवांना मारशील तू

समजतोस धर्म रक्षणाच मोलाच काम

ते स्वार्थी विध्वंसाच षडयंत्र आहे

गुंतु नको भावा तुला शाहुंची आन आहे

असशील समर्थक तु धर्माचा

दंगयात जीव जातो मानसाचा

ऊजाड होतात माय भगिनी

नि उघडयावर लेकरबाळ

वकतवय करणारयांच आलबेल सार आहे

कुटनिती ने आपला डाव साधायचा आहे

नाटकीपणाचे हे सारे ढोंग आहे

भुलू नकोस भावा तुला

ज्योतीबाची आन आहे

तु रस्त्यावर ऊतरशील आवेशात

नारे देशील अवैद्य कृती केली म्हणून

तुरुंगात जाशील

कोठडीतलया अंधारात

तळमळत रहाशील

विचार कर तुझ्या

आईची अवस्था काय होईल

पाखंडी वृत्ती का तुला 

सोडवायला येणार आहे?

गुंतु नकोस भावा तुला भीमाची आन आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action