मनोरजंन
मनोरजंन
अंधभक्तीचा खेळ चालला
सत्तेचा उन्माद मांडला
रामाचे दुकान थंडावले
आता त्याच्या सेवकाचा बाजार मांडला
देऊळ नि मंदिर कमी पडली
रस्त्यांवर घरांसमोर
चौकाचौकात भोंगयाचा
व्यापार मांडला
सोमे गोमे आले
चालीसा पठण करणारच म्हणाले
कार्यकर्ते जमा झाले
घोषणांनी आसमंत निनादले
आव्हाने प्रती आव्हाने झाली
एकमेकांवर शिव्यांची लाखोली वाहीली
गाडया आडवलया
बॅरॅकेटस तोडले
ठीयया मांडला ऊर बडवले
सत्ता धारी विरोधी अपक्षाने
फालतू गरळ ओकली
पोलीस यंत्रणा सज्ज झाली
दंगल पथक एम्ब्युलन्स
अग्निशमन रवाना झाले
ऊन तापले नेते भडकले
हनुमान चालीसा धर्माच
काम विरोध
करायचा नाही म्हणाले
आपापल्या घरी करावे पठाण
दुसर्या गोटातले कार्य कर्ते भडकले
मिडीयाला उंसत कसली
अंथरून पांघरूणा सहीत
काहीच न घडलेल्या घटना
स्थळावरचे लाइव घडामोड
तेल ओतुन सा-या देशाला
श्वास रोखुन दाखवत सुटली
ऊरली सुरली लाज
सा-या जगाने काल पाहीली
पिचलेली जनता ही काल
गालात का होइना हसली
चला बिनातिकीटाची
एक दिवस का होइना
करमणूक झाली
नायतर गॅस हजार,
पेट्रोल शंभर पार
भाज्यांचे धान्यांचे दर
आसमानाला भिडलेत
बेरोजगारीने तरूण अडलेत
पिढीत महीला आक्रोश करतात
न्याय मागताच मारल्या जातात
पोलीसांची सामान्यांशी दादागिरी
महागाई,बेइमान सरकार भ्रष्टाचार,
शोषण अत्याचार भांडवलदारांचा देश
लुटिचा कारभार
खुर्चिसाठी वाटेल त्या स्तराला जाणार्या
नालायक निरलज्ज बेशरम
लोकप्रतिनिधींचा सुककाळ
आणि....????????????????
कधीही न संपणारया
मरेपर्यंत न संपणारया
सामान्य सर्वसामान्य
माणसाच्या पोटाचा प्रश्न
या सगळ्या बेकार गोष्टीतुन
एक दिवस तरी सुटका मिळाली
मिडीयाने क्षण क्षणाचे
अपडेट देऊन
सामान्य जनता
टिव्ही समोर खिळवून ठेवली
