रंग कोणता तुला हवा
रंग कोणता तुला हवा
शुभ्र धवल पांढरा रंग सात्विक निर्मळतेच प्रतिक
निषेध वाइट कु कर्माचा पुरावा रंग काळा
भव्य,विशाल अनंत आभाळाचे ध्येय गाठणया शिकवतो रंग निळा
शहीदांच्या बलीदानाचे रकत दर्शवितो
रंग लाल रंग केशरी ऊधळतो क्रांतीचा गुलाल
पिवळा रंग तेजोतय करतो आयुष्य ऊन कोवळे,
कोमल दाहक रूपेरी जीवनाचे सार सांगुन जातो हळुवार
कधी चटके कधी कवडसे सुकधुखाचे मानुस झेलत रहातो
हिरवा रंग सृजणाचा नावीण्याचा निर्मितीचा
हर्ष आनंद उत्सवाचा
मरणातही सुख दाखवणारा
नवी पालवी वंसताची जन्म मृत्यूचे गुढ ऊलगडती
निसर्गातुन निर्मिती माणसा तुझी निर्वाणही निसर्गात
मातीतुन ऊगविली हिरवी पालवी जणू सांगते
मातीतुन जन्म तुझा मातीतच तुझे अंतिम प्रयान
सप्तरंग इंद्रधनुचे शिकवून जातात जगण्याची गाथा
कोणकोणत्या रंगात रंगायचे तुच तुझे ठरव आता
