STORYMIRROR

ANJALI Bhalshankar

Action Inspirational Others

3  

ANJALI Bhalshankar

Action Inspirational Others

बाबा माफ करा मला

बाबा माफ करा मला

1 min
196

आम्ही अभिमानाने जयभीम म्हणतो

जयंती पुण्यतिथी ऐटीत साजरी करतो

मोठाले पुतळे ऊभारतो भिंतीवर तसबीरी टांगतो

ढोल ताशे डिजेच्या तालावर मिरवणूका काढतो

बेभान होऊन नाचतो

दलीतांचा नेता म्हणून जगाला ओरडून सांगतो

माफ करा बाबा तुम्हाला समजुन घ्यायला

आम्ही खुप कमी पडतो

तुमचे ज्ञान नि तुम्ही शिकवलेलला स्वाभिमान

आम्ही आजही गहान टाकतोय ऐकयाची शिकवण

विसरून जातीभेदाला पोसतोय

बाबासाहेब डोकयावर नाही

डोकयात घ्यायला हवेत

हे विसरतोय आत्मसन्मान गमवून लाळघोटे

पणाही करतोय वाचाल तर वाचाल

ही शिकवण सोडून व्यसन

एशोआराम सवलती ऊपभोगतोय

पैशाची मस्ती आपलयाच बांधवांना दाखवत हिंडतोय

तुमचे आचार विचार सोडून बाकी निरर्थक सारच

आम्ही करतोय माफ करा बाबा

आम्ही तुम्हाला समजुन घ्यायला

आम्ही खुप कमी पडतोय...

तुम्ही दिलेला बुद्ध हरवलाय?

प्रज्ञा शील करुणा हि टॅगलाइन झालीय

व शिका संघटीत व्हा संघर्ष करा

हि घोषवाक्यातच ऊरलीत

बाबा खरच माफ करा मलाही

मी ही कूठेतरी कधीतरी जात लपवीली

स्वाभिमान गमावून तुमच्या बाणेदार

शिकवणीची होळी केली

कधी कधी स्वताची लाज वाटते मला

तळपता ज्ञानसुर्य जो जगाला तेज

देऊन गेला कमी पडलो आम्ही

सारेच त्याची प्रखरता झेलायला संकुचित

विचारात जोखडून अज्ञानी वृत्तीने सूर्याला

मिनमिनती ज्योत आम्हीच समजलो

माफ करा मला व तुमच्या तमाम लेकरांनाही 

ज्यांनी जातीमध्येच जोखडून ठेवले

तुमच्या प्रतिमेला

तुम्ही जगाला बुदध दिला

अन आम्ही धर्माच्या नावाने लढून

आमंत्रण देतोय विनाशाला

बाबा जमलयास माफ करा आम्हाला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action