STORYMIRROR

ANJALI Bhalshankar

Tragedy Classics Inspirational

3  

ANJALI Bhalshankar

Tragedy Classics Inspirational

सृष्टीची शिकवण

सृष्टीची शिकवण

1 min
155

होरपळलेलया ग्रिष्माची धग

चहुकडे रखरखतं ऊन

ऊष्ण वारयाच्या झळा

पानझड मनाला

हुरहुर लावणारी

निळया गर्द आकाशात

तप्त आगीचा पिवळा गोळा

मानवाच्या तुच्छतेची जाण देणारा

चैत्र येई चैतन्य घेऊनी

वंसत बहरतो पानोपानी

हर्ष भराने कोकीळ

गाई गाणी गर्द सोहळा

बहरला ॠंतुचा शीन

त्या सवे लोपतो

 निराश ऊदास नीरस विचारांचा      

निसर्ग सदैव तत्पर श्रेष्ठ निर्माणाला

जीवन धरेवरचे अंश

निमिष मात्र ब्रम्हांडाचे

जगणे व्हावे सरळ सोपे

सृष्टीच्या चाकोरीचे

खडतर भेगाळ भुवरी

पडतील थेंब पावसाचे

पसरतील मग गालीचे

हिरव्या तृणाचे

सुंदर आहे जगणं

नव्या दिवसाची नवी आव्हाने

नितीमत्तेचे बेगडी मुखवटे

सारून जरा बाजुला

सृष्टी च्या नजरेने पहावे

मानसाने मानवाने


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy