आजी आजोबा लवकर या
आजी आजोबा लवकर या
गेलात आजीआजोबा
तुम्ही दूर काकाकडे
कंपनीचे काम असे
सदा आईबाबांकडे
गोष्टी सांगायची आजी
मला छान रंगवून
गुळपापडीचे लाडू
मला द्यायची करुन
आता सकाळी कुकर
लावतच नाही आई
माझी वरण भाताची
सवयच गेली बाई
पत्ते नि बुद्धिबळाचा
आजोबांशी जमे डाव
सूट द्यायचे डावात
जिंकायची मला हाव
लाँकडाऊन बोअर
नाही खाऊ गप्पा डाव
आता गेलाय कोविड
नात कंटाळली राव
लवकर तुम्ही याच
भरपूर मजा करु
वाट बघते नेहमी
कधी रुटिन सुरु
आता शाळा झाली सुरु
तरी आठवण येते
गरमागरम खाऊ
कधी मिळेलसे होते
लवकर विमानाने
झटपट तुम्ही यावे
मला तुमच्या कुशीत
छान घट्ट लपेटावे