सांभाळून घेशील का देवा मला
सांभाळून घेशील का देवा मला
हरले या जगात,
सत्वन करशील का,
खूप अडचणीत आहे देवा
सांभाळून घेशील का
संकट इतके आहे की
तुझ्या शिवाय मार्ग नाही
तुझ्या नामाशिवाय
आता ध्यास कुठालाच नाही
धावुनी येणारे देवा
मित्र बनुनी समजावून सांग ना मजला,
अवतार तुझे अनेक रुपी
बाप बनुनी पदरात घेना मला
चुकले तर माफ कर ना मला
तुझ्याशिवाय कोण आहे मजला
तूच भाग्य लेहीले माझे
काय माझ्या नशिबी हे तुलाच समजले
हळहळलेय आता,
धीर देना मला
नेहमी सांभाळून घेतलं मला
परत एकदा सांभाळून घेणा मला ....
