स्त्री
स्त्री
भू- वरी या हरवले मी,
सापडून देईल का कुणी.
जगाशी लढता लढता,
स्वतः ला विसरलेय मी.
आस्तित्व कुठय माझ,
हा प्रश्न रोज अडवतोय.
लोक काय म्हणतील,
याचाच ध्यास मला लागतोय.
कोणाशी बोलणे,
आज नजरेत खटकते.
डोळ्यातील अश्रू पण,
आज मनात लपवतेय.
कसं वावरू या जगात,
कसं राहावं या समाजात.
शिकण्यावरती पण आज,
प्रश्नाच्या लाटा उसळतात.
कुणी बनवलं हे जग,
ज्या जगात खेळ मांडला.
दुर्गे रुपी या स्त्रीचा,
तुम्ही छळ केलाय.
आजही सांगतेय,
नका करू शंका.
नाहीतर, एक ना एक दिवस,
अंत होईल माझा.
