STORYMIRROR

Arati Ingole

Others

3  

Arati Ingole

Others

पांडुरंगा

पांडुरंगा

1 min
418

परिस्थितीशी गाठ द्यावयची आहे 

संगतीने माझ्यासोबत थोडी 

तिच्याशी झूंझ करशील का,

पांडुरंगा माझ्या मदतीला 

धावत येशील का 

पंढरपूरची वारी करीन मी

चंद्रभागेची आरती करीन

माय माझी रखुमाई

बाप माझा तू,

जनाई सोबत दळण दळीलेस 

माझ्यासोबत ओव्या गाशील का

वारीत तुझ्या सहभागी होईन 

भजन मी तुझेच गाईन 

नाव तुझे माझ्या मुखी 

मस्तक तुझे माझ्या चरणी 

दाहीदिशात नाद दुमदुमला

पंढरीच्या राज्य विठ्ठला,

हरी हरी नावाचा 

लळा हा लागला

हाथ ठेव दोई माझ्या 

आशीर्वाद असावा नेहमी सोबती माझ्या 

वारीत जरी नाही 

यायला जमले मला 

तर तुझ्या हृदयी

नक्की येऊ दे मला 

महाराष्ट्राची ही पावनभुमी 

तुझ्या नावाने धन्य झाली 

पांडुरंगा तुझ्या रूपाने तर 

आज ही वर्दी उभी राहिली 

विटेवरी तू उभा 

अन् हा रसतयावरी उभा असतो 

आज तुझ्यारूपाने पंढरीराया,

त्यांच्यातील देव आम्हाला दिसतो 


Rate this content
Log in