STORYMIRROR

Arati Ingole

Others

3  

Arati Ingole

Others

बाबा सोडू नको रे हात माझा.....

बाबा सोडू नको रे हात माझा.....

1 min
596

दुखाच्या वाटेवर सुखाच्या दारावर 

बाबा सोडू नको रे हात माझा

दाही दिशा हा खेळ चालला,

बाबा तुझ्याच नावाचा अंत कसा झाला

तुझ्याविना घर हे सुने,

तुझ्याविना जीवन हे अर्धे.

तू का नाही रे बोलला,

तू का रे लपविला,

तू का नाही रे म्हणला,

तूच आमचा पंढरीचा राजा.

बाबा सोडू नको रे हात माझा 

आईची माया दिसते,

तिचे कुरवाळणे दिसते.

तू का नाही दाखवत माया,

तू का नाही दाखवत छाया.

छत्र तुझेच आमच्या डोई,

प्रेम तुझे साई वाणी.

दुःखाच्या वाटेवर सुखाच्या दारावर 

कधी दूर नको रे जाऊ,

तुझ्याविना कोणीही नाही,

या अश्रूना ही कींमत नाही,

तुझ्याविना माझ्या यशाला ही सौंदर्य नाही,

बाबा तुझ्याविना तर जीवनाला ही अर्थ नाही.

तुझ्याविना अंत होईल रे मनाचा,

बाबा सोडू नको रे हात माझा,

बाबा सोडू नको रे हात माझा......


Rate this content
Log in