खेळ स्वप्नांचा
खेळ स्वप्नांचा
आता कुठे सुरू झाला
खेळ स्वप्नांचा कसा वास्तवातला
वास्तवात सतत विस्तव असतो
पाहणाऱ्या स्वप्नांना धुळीस मिळवतो
त्यांच्या नेहमी खोट्या अपेक्षा
पदरी पडे कायम उपेक्षा
दिवास्वप्न निशा बनून जातात
कधी हव्या, नकोशा वाटतात
स्वप्नातल्या स्वप्नांना काहीसे जगवा
उद्याच्या आशांना असच पळवा
