वेगळे
वेगळे
वेगळे पण तुझे कुठे मला दिसले
मी मात्र तुझ्यातच हरवलेली
प्रीत जडली तुझ्या वर कान्हा,
राधा मी तुझ्या अंतरंगात वसलेली
तू अन् मी आहोतच कुठे वेगळे,
राधा तर श्री हरी ची बासुरी बनलेली
सदैव कान्हा च्या सुरात भिजलेली
जगाला दिसल त्याचं वेगळेपण,
पण राधा खरच होती का कान्हा हुन वेगळी?
समाप्त
