STORYMIRROR

Bharati Raibagkar

Abstract

4  

Bharati Raibagkar

Abstract

नंदादीप-संवादाची तेलवात

नंदादीप-संवादाची तेलवात

1 min
217

शुभंकरोति कल्याणम् दे 

सकारात्मक ऊर्जा घरात

दिव्या दिव्या दीपत्कार जेव्हा 

लावू शुभंकर सांजवात


कितीक साधने प्रकाशाची

चमचमणारी दुनियेत

परि मंद तेवणारा दीप

भाव प्रसन्न, सात्विक देत


मंदिरातील गाभाऱ्यातही

जेव्हा नंदादीप उजळती

दिवे विजेचे मालवताच

येई मांगल्याची अनुभूती


आजी-आजोबा नंदादीप हे

शांत तेवणाऱ्या जणू ज्योती 

आशीर्वच अमोल तयांचे

आम्हा वरदानच ठरती


दीपक, पणत्या, नंदादीप

सजीव सदैवच घरात

स्नेह, प्रेम, माया, संवादाची

पुरवावी त्यांना तेलवात



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract