Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Bharati Raibagkar

Inspirational

4  

Bharati Raibagkar

Inspirational

स्वीकार

स्वीकार

1 min
456


ते एक पीस अतिसामान्य

नव्हते इंद्रधनुष्यी रंग चमचमणारे

नव्हतं आकर्षक रूपही भुलवणारं

नव्हतं कोणी फिरवत गालावरून

नव्हतं कोणी वह्या-पुस्तकात ठेवत

ते झिडकारणं, ते उपेक्षिताचं जिणं

वाऱ्याबरोबर उडत होतं इकडून तिकडं

जणू गिरक्या घेत होतं नशीबच एखाद्याचं 

म्हणूनच करत होतं स्वतःशीच खंत…


आणि अचानक मिळाला समर्थ आधार क्षणभर अविश्वासानं ते बावरलं, थरथरलं

'मी कधीच अंतर देणार नाही तुला'

तू जसं आहेस तसंच प्रिय आहेस मला

सगळेच नसतात राजहंस, नसतात सगळेच कोकिळ…


पण हक्क असतो सगळ्यांना जगण्याचा, स्व-कर्तृत्व दाखवण्याचा

मान्य कर स्वतःचं अस्तित्व

स्वीकार कर स्वतःचा

दिसण्यापेक्षा असणं महत्त्वाचं

रूपरंग चार दिवसांचे सोबती

गुणांचं कर्तृत्व जन्मभराची ठेव'


आणि आणखी एक…

आधाराच्या कुबड्या नकोत सदैव

स्वबळावर जगता यावं…

विश्वास ठेवावा स्वतःवर'


कर्ण-संपुष्टात साठवले ते अमृत शब्द

बळ मिळालं मनाला 

थांबलं ते पाचोळ्यागत भिरभिरणं

पीस आश्वस्त झालं, सुखावलं…

आणि मग अतीव विश्वासानं तेथेच विसावलं…


पण……….

हे कणाकणानं तुटणं…?


छे! हे तुटणं नव्हेच...

हे तर स्वतःतील न्युनगंडाचे रज:कण वाऱ्यावर उधळणं...


आणि तुटणं असलंच तर...

हा आहे निसर्ग नियम

हळूहळू प्रवास करणं…अंताकडे

पुन्हा नव्याने सुरूवात करण्यासाठी…

ही मावळतीची संध्या ऊद्या उगवत्या उषेत परावर्तित होणार... तशीच


पण…सिद्ध करून स्वतःला…

होऊन स्वयंसिद्ध……..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational