STORYMIRROR

Bharati Raibagkar

Others

4  

Bharati Raibagkar

Others

विविधरंगी स्वरूप

विविधरंगी स्वरूप

1 min
248

प्रेम नसावंच फक्त

तिच्यात आणि त्याच्यात

प्रीत होते दृगोच्चर

वेगवेगळ्या नात्यात


मातापित्यांची ममता

माया भावा-बहिणीची

विशुद्ध भाव ठरवी

खरी कसोटी मैत्रीची


निसर्गाचे संरक्षण़

दया मुक्या प्राण्यांवर

जिव्हाळ्याचे दुजे नाव

लोभ चराचरावर


कधी जपावे मनास

जीव जडो स्वतःवर

लळा असावा शब्दांचा

साह्य व्यक्त होण्यावर


निरपेक्ष, समर्पित

दिव्य, उदात्त भावना

एकतर्फी प्रेमापायी

करू नये विटंबना


विविधरंगी स्वरूप

कितीक नावे तयाची

प्रत्येकास भुलविते

अशी महती प्रेमाची


Rate this content
Log in