STORYMIRROR

Bharati Raibagkar

Abstract

4  

Bharati Raibagkar

Abstract

गुरू-घ्यावा पारखून

गुरू-घ्यावा पारखून

1 min
238

सर्व सृष्टी असे माझी

गुरु कल्पतरू सम

निरपेक्ष दाता तीच

तिला वंदिते प्रथम


जन्मदाते असतात

गुरु आणिक पालक

अविश्रांत कष्ट त्यांचे

तेव्हा घडते बालक


अक्षरांशी होते मैत्री

छान लाभता शिक्षक

मिळे ज्ञान सर्वांगीण 

गुरुजन परीक्षक


स्वयंपूर्ण होण्यासाठी

देती ज्ञान व्यवहार

असे निरक्षर जरी

अनुभवी, जाणकार


अध्यात्माच्या दुनियेत

खरा साधू ओळखावा

असे निरीच्छ, नि:संग

गुरु तयासी मानावा


मनाचीही शिकवण

नको राहूस रिकामा

पर उपकार कार्य 

पुण्य तेच येई कामा


आधुनिक जगतात

गुरु समाज-माध्यम

उपयोग हो चांगला

जर बाळगु संयम


सत्गुरूंची आयुष्यात

ऐसे भेटे मांदियाळी

पारखुन घ्यावे नीट

फसगत येई भाळी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract