STORYMIRROR

Bharati Raibagkar

Inspirational Others

3  

Bharati Raibagkar

Inspirational Others

हरित दान

हरित दान

1 min
165

हरित दान

स्वीकारु मोद भरे

ठेवूनी जाण


हिरवा हस्त

वेलींनी लगडला

दिसतो मस्त


डौलात उभा

वृक्ष हिरवागार

फळांची शोभा


पोपटी, पीत

नयन सुखावले

नक्षी रेखित


सोन किरणं

रम्य पसरली आभा

निसर्ग देणं


वल्लरी वेढा

भकास निसर्गाचा

सुटेल तिढा


विशुद्ध हवा

प्रदुषण रहित

श्वास रहावा


कृतज्ञतेने

रक्षु अमोल ठेवा

देऊ वचने


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational