STORYMIRROR

Bharati Raibagkar

Others

3  

Bharati Raibagkar

Others

उद्देश आणि उपचार

उद्देश आणि उपचार

1 min
178

रूढी,प्रथा पाळतांना

करू नवीन विचार

उद्देशही ओळखावा

नको फक्त उपचार


संतुलन निसर्गाचं

पर्यावरणही ठावे

फांद्या ओरबाडतांना

उपयोग समजावे


होते पूर्वज हुशार

नाडी खरी ओळखली

धर्म आणि ऋतुचक्र

योग्य सांगड घातली


नको टोकाचा विरोध

अंधानुकरण सदा

रोपं लावून पृथ्वीला

देऊ हरित संपदा


वटवृक्षातळी मिळे

प्राणवायू प्राणदाता

घडे चालणे सहज

सूत फेरे गुंडाळता


परंपरागत प्रथा

नव्या विचारे पाळुन

श्रद्धा, पूजन, भावना

घेऊ उद्देश जाणून


Rate this content
Log in