STORYMIRROR

Bharati Raibagkar

Inspirational

4  

Bharati Raibagkar

Inspirational

हिरवं देणं

हिरवं देणं

1 min
361

निसर्ग

देवाचं देणं

संजीवन मिळता पर्जन्याचं

दिसतं साजिरं हिरवं देणं


निसर्ग

क्षमाशील सखा

साधूया त्याच्याशी मैत्र

होईल तोच सच्चा पाठीराखा


निसर्ग

अलौकिक सौंदर्य

न्याहाळण्या अपुरे जीवन

दररोज नित्य नवे आश्चर्य


निसर्ग

मूक साक्षीदार

थांबवला नाही हव्यास

तृतीय नेत्र नक्कीच उघडणार


निसर्ग 

उदार दाता

अनंत हस्ते उधळणारा

तया रक्षू या, तोच त्राता


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational