जीवनाचा सारीपाट
जीवनाचा सारीपाट
मम जीवनाच्या , सारीपटावर
काही हरवले , काही गवसले
सुसंस्कृत घरी , जन्म सुदैवाने
आई बाबा आजी , आजोबा भाग्याने
शाळा खेळ मैत्रिणी , बाल्य सरले
शिक्षण माझे , सहज पूर्ण झाले
कला शिकण्याची , इच्छा अधूरीच
सर्व कसे मिळेल , एका ओंजळीत
भाग्याने नोकरी मिळे , आनंद माईना
कला , क्रीडा शिकणे , चंग बांधला
लग्नाच्या गाठी , ब्रम्हदेव बांधी
सुशिक्षित निर्व्यसनी , पती देई
कस लागे संयमाचा , कष्टही साहले
मौज मजेच्या दिनांस , कशी मी पारखले
जीवन वेलीवरी , फुले दोन गोजिरी
बाललीलांमधे रमे , मातामाऊली
शिकून शहाणे झाले , माझे दोन लाल
भाग्यवती मी , देवा दान अमोल
निवृत्ती नंतर , सख्या विदुषी लाभल्या
संगतीत त्यांच्या , काव्यबहर आला
जीवनात ही घडी , अशीच राहू दे
मनीषाची मनीषा , सफल होऊ दे
