आई ...
आई ...
ममतेचं गाव
वेदनेचा ठाव
अंतरीची धाव
आई तिचे नाव
चंदनाची काया
वात्सल्याची छाया
जगा उध्दाराया
आईचीच माया
संस्कारांची खाण
शिस्तीचंही वाण
ईश्वराचं दान
आई तू महान
घडविण्या पोरं
बनते कठोर
पाळण्याची दोर
आई असे थोर
उबदार शाल
संकटात ढाल
सुखाची मशाल
काळीज विशाल
वर्णावी किती
आईची महती
शब्द न पुरती
करण्या आरती
