ओढ पावसाची
ओढ पावसाची
भेगाळल्या अवनीला,
प्रतिक्षा तृप्त होण्याची...
देई परिमळ मातीचा,
लागली ओढ पावसाची।।
माळरान कृश जाहले,
हिरवी पालवी फुटण्याची...
आतुर सर्व वृक्ष-वेली,
लागली ओढ पावसाची।।
आली वेळ पोशिंद्याची,
बीज मातीत पेरण्याची...
मेघांकडे नित्य पाहतो,
लागली ओढ पावसाची।।
वणवण हिंडे प्राणी-पक्षी,
तृष्णा भागविण्या स्वतःची...
सज्ज मयुर नाचायाला,
लागली ओढ पावसाची।।
तप्त भाष्करा तेजापुढे,
होई आंघोळ घामाची...
कुलर,एसी फिके पडती
लागली ओढ पावसाची।।
सुखी करण्या सकळांना,
नड आहे संजीवनीची...
पाहण्यासं सृष्टी नटलेली,
लागली ओढ पावसाची।।