जिंकू अन् मात करू
जिंकू अन् मात करू


कोरोना या शत्रूसंगे, युद्ध आमुचे सुरु....,
जिंकू अन मात करू।।धृ।।
लढतील डॉक्टर्स, लढ़तील नर्सेस,
लढतील पोलिस, लढतील सेवक।
लॉकडाऊन पूर्ण करू....
जिंकू अन मात करू।।१।।
सोशल डिस्टन्सिंग हे एकच उत्तर,
गर्दी करण्या न जाऊ रोडवर।
शिस्तीचे पालन करु....
जिंकू अन मात करू।।२।
स्वच्छता हा मार्ग आहे खरं,
सॅनिटायझरचा करूया वापर।
कोरोनाला दूर सारू....
जिंकू अन मात करु।।३।।
हानी होत आहे भयंकर,
काही जनता आली रस्त्यावर।
मदतीचा हात हाती धरू.....
जिंकू अन मात करू।।४।।
देश आमुचा महापुरुषांचा,
बाबासाहेबांच्या संविधानाचा।
विज्ञानाशी मैत्री करू.....
जिंकू अन मात करु।।५।।