अशी ती माय
अशी ती माय
नऊ महिने वेदना अंतरी,
गोंडस बाळ घेतला पदरी।
संगोपणाची कसोटी खरी,
अर्पितो सर्वस्व आपल्या परि।।
अशी ती माय...........।।१।।
तान्हयासाठी जीवनाचाआटापिटा,
कधी देऊन पोटाला चिमटा।
जरी मारत असेल अंगठा,
अभ्यासात तिचा असतो वाटा।।
अशी ती माय...........।।२।।
आवडी निवडीने आम्हा सवारी,
सुख-दुःखाची ती वाटेकरी।
आयुष्याला देई उंच भरारी,
तरी ना तिला अपेक्षांची उभारी।।
अशी ती माय............।।३।।
पाखरू शिकून मोठा झाला,
माये पासुन दूर कामाला गेला।
सून-नातवंड़ाना पोरखा केला,
जुना घर तिनं नाही सोडला।।
अशी ती माय.........।।४।।
आले म्हातारपण झाले निराधार,
बापुने नाही दाखवले नवीन घरदार।
सुखाने नांदो माझ्या सोन्याचा संसार,
देऊन वरदान होई वृद्धाश्रमी सवार।।
अशी ती माय..........।।५।।
जन्माला घालुन काय पाप केलं मायेनं?,
आधाराच्या वेळी काही साथ देतात सोडून ।
नका विसरू सज्जनहो सर्वांसाठी म्हातारपण,
नाही तक्रार कुरकुर मरण पत्करी आनंदान।।
अशी ती माय.............।।६।।
मातेवर होतो चमत्कारिक लेखन,
मातृदिनी आपला ऊर येतो भरुन।
फेडू पांग सांरे घेऊ तिला समजुन,
वाटू द्याआपल्या कर्माचाअभिभान।
हीच संतती पोटी जन्मा यावी परतून।।
अशी ती माय...........।।७।।