विज्ञानवादी बना...
विज्ञानवादी बना...




थाळी-टाळी वाजवून कोराेना बरा होत नाही,
अंधारात दिवे लावले तरी धोका टळत नाही।
साऱ्या विश्वात नाचतो आहे मृत्यू भयानक,
अशावेळी बालिशपणा कुणी करतो का अचनाक।।१।।
प्लेग, देवी, कॉलरासारखी येऊन गेली महामारी,
विज्ञानाच्या साथीने मानव घेतला उंच भरारी।
अशा संकटात देव धावला का कधी?
विज्ञानच धावतो अन् दूर करतो व्याधी।।२।।
कुणीही आम्हाला देतात फुकटचे सल्ले,
विवेकास न पटो तरी आम्ही करतो कल्ले।
काय आमची जात मेंढरासारखी चाले,
विज्ञाननिष्ठ माणसांवरही इथे होतात हल्ले।।३।।
संविधानही देतो आम्हा विज्ञानवादी तत्त्व,
अज्ञानातून शोधतो आम्ही सुखाचे सत्त्व।
मन, मेंदू, बुद्धी, मनगट ठेऊ नका गहाण,
अविचारी सल्ल्याने देश बनेल का हो महान?।।४।।