धन्य तो तथागत
धन्य तो तथागत




जो लुंबिनीत जन्मला,
नाही मायाजाल त्याला।
सुख-दुःख शोधाया,
सर्व ऐश्वर्य त्यागला।।
तो धन्य सिद्धार्थ झाला।।१।।
केले तप गयाला,
ज्ञानप्राप्ती मिळाली तयाला।
देऊन प्रवचन सारनाथला,
ज्यानी जाग दिली मानवतेला।।
तो धन्य बौद्ध झाला।।२।।
दिले अष्टांग जगण्याला,
शांतीचा मार्ग दाविला।
तिलांजली दिली वर्ण-जातीला,
ज्यांनी धम्म क्रांतीचा रुजविला।।
तो धन्य महात्मा झाला।।३।।
नाकारले त्यांनी क्रोधाला,
'अत्त-दिप-भव' सूत्र जगण्याला।
जोडीले तत्त्व निसर्गवादाला,
ज्यांचा धम्म अशोक, भीमरावांनी स्वीकारला।।
तो धन्य तथागत झाला।।४।।