महाराष्ट्राची थोरवी
महाराष्ट्राची थोरवी




हा महाराष्ट्र माझा, साऱ्या देशाचा राजा।
पूर्ण करतो स्वप्न, अन् सर्वांच्या आशा।।धृ।।
इथे घडले छत्रपती, फुले, शाहू, आंबेडकर।
यांनी स्थापिले सुराज्य, मोडून दुही अटकेपार।।
अरि उभे चहुकडे, त्यांची केली दुर्दशा।।।
पूर्ण करतो स्वप्न, अन् सर्वांच्या आशा।।१।।
इथे संत परंपरा, ज्ञानबा-तुकोबा-डेबूची।
रचिले अभंग-किर्तन, शिकवण देऊन समतेची।।
दूर केली अंधश्रद्धा, करून मनुंची निराशा।।।
पूर्ण करतो स्वप्न, अन् सर्वांच्या आशा ।।२।।
इथे खेळाडू जन्मले, सुनिल-सचिन-रोहीत।
विक्रम अभेद्य मांडीले, करून विश्वाला मोहित।।
मान देशाची उंचावली, भरुन रगा-रगात नशा।।।
पूर्ण करतो स्वप्न, अन् सर्वांच्या आशा।।३।।
एक मेला स्थापना, माझ्या मराठी राज्याची।
आपसूक स्मृती होते, जागतिक कामगार दिनाची।।
ठिणगी पडली ऐक्याची, इथेच जागल्या आकांक्षा।
पूर्ण करतो स्वप्न, अन् सर्वांच्या आशा।।४।।
साऱ्या क्षेत्रात वर्मी, माझ्या राकट राज्याची ।
सदा दाखवतो ऊर्मी, आपल्या काटक कर्माची।।
जातो धाऊन संकटी, आड घालतो अवदशा।।।
पूर्ण करतो स्वप्न, अन् सर्वांच्या आशा।।५।।