एकदातरी निसर्ग होऊन बघायचय...
एकदातरी निसर्ग होऊन बघायचय...


ती एक रम्य सकाळ, आणि तो उगवणारा सूर्य
त्यातच सुरू होतात आपले नित्य कार्य,
ते किलबिल करणारे पक्षी, त्यांचा तो किलबिलाट
शोधत असतात आपल्या सहवासाची वाट!!
आणि म्हणूनच एकदा तरी निसर्ग होऊन बघायचय मला......
पशू- पक्षी, वृक्ष- वेली , एक तो स्वच्छंद वारा
बघतच रहावा त्यांचा तो मनमोहक तोरा,
त्यातच लागते वसंताची चाहूल...
आणि पुन्हा निघतात वृक्ष वेली फुलांनी न्हावून!!
आणि म्हणूनच एकदा तरी निसर्ग होऊन बघायचय मला......
सुगंध दरवळे चोहीकडे त्या ओल्या मातीचा,
म्हणुनी बळीराजा सुखावलाय, कुशीत धरणी आईच्या,
बाळ म्हणुनी निसर्ग करतो आपले संगोपन,
म्हणूनच चला आपण ही करूया निसर्ग संवर्धन!!!!
आणि म्हणूनच एकदा तरी निसर्ग होऊन बघायचय मला......
संध्याकाळी मावळणारा तो सूर्य, देऊनी जाई आस उद्याची
करत असतो त्याच्या आसेवरच कामे आपली नित्याची,
किती हा छान निसर्ग वाटतो सगळ्यांना हवाहवासा,
म्हणून च सगळ्यांनी तो जपावा समजून आपला वारसा!!
आणि म्हणूनच एकदा तरी निसर्ग होऊन बघायचय मला.......