STORYMIRROR

Rutuja Thakur (Pawar)

Others

4  

Rutuja Thakur (Pawar)

Others

बाप

बाप

1 min
24.2K

बाप शब्द फक्त दोन अक्षरांचा, अर्थ मात्र पराकोटीचा

करत असतो फिरफिर सतत, घाम गाळतो कष्टाचा,

एकट्याने कुटुंब सांभाळायचं असतं, जबाबदारी असते खूप

तरी एकटा सामोरे जातो, संघर्षांन्ना हसतमुख!!!

तो फक्त बापच असतो......


काबाड कष्ट करुनी, तो संसार करतो थाटाने

बघुनी चेहरे बाळांचे, पुन्हा ऊर्जा येते त्याला जोमाने,

झिजते अपुल्या बाळांसाठी, काया त्याची चंदनापरी

सुखी राहुदे माझ्या लेकरांना,एकच स्वप्न त्याच्या उरी!!!

तो फक्त बापच असतो......


जखमा होऊन सुद्धा कित्येक,पाय झिजवायचे असतात त्याला

ओझं कर्जाचं डोक्यावर,तरी निभवून न्यायचं असतं त्याला,

करुनी पूर्ण स्वप्न मुलांचे, श्वास घेतो सुखाचा

हा तोच बाप असतो, ज्याच्यावर डोंगर असतो दुःखाचा!!!

तो फक्त बापच असतो......


बाप होणं खूप कठीण असतं,पण हे सोपं करून घेतो तो स्वतःला

करुनी लेकरांचे ध्येय पूर्ण, तो दाखवून देतो प्रत्यक्ष जगाला,

किमया आहे ही देवाची, ज्याने घडविला हा बाप

ऋणी राहील मी देवाची, ज्याने हे भाग्य दिले पदरात!!!

तो फक्त बापच असतो......


बाप घरात वावरूनही, कधी कळला नाही आम्हाला

चूक झाली आमची देवा, माफ कर आम्हाला,

कुटुंबप्रमुख आमच्या घराचा, सदैव राहुदे आनंदाने

लागो आमचे आयुष्य त्याला, हीच प्रार्थना करतो मनाने!!!

 हीच प्रार्थना करतो मनाने!!!


Rate this content
Log in