STORYMIRROR

Rutuja Thakur (Pawar)

Abstract Inspirational

3  

Rutuja Thakur (Pawar)

Abstract Inspirational

रेशीमगाठी

रेशीमगाठी

1 min
224

गाठी असतात सात जन्माच्या

पण खरं तर त्या असतात जन्म-जन्मांच्या

गाठ रेशमाची कधीही न सुटणारी

नाजूक नात्यांना कायमची जपणारी

गाठ असते छोटी, पण किमया आहे खूप मोठी

नात्यांना अलगद मारून बसते ती घट्ट मिठी

तिच्यामुळेच येते प्रत्येक नात्याला खरी शोभा

म्हणूनच तर सप्तपदीं मध्ये तिचा मान मोठा

आयुष्यात न तुटणाऱ्या च असतात खऱ्या रेशीमगाठी

आयुष्यभर त्या जपाव्या लागतात आपल्या संसारासाठी

रेशमासारखे मऊ आणि गाठीसारखे घट्ट असावे जीवन

कितीही दुरावलो गेलो, तरी जवळ असावीत मनं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract