थोडंसं मनात राहिलेलं
थोडंसं मनात राहिलेलं


थोडंसं मनात राहिलेलं
मनाचं क्षेत्र व्यापलेलं
मनाच्या गाभाऱ्यात
मनाचंच स्थान जपलेलं ...
एक स्वप्न ....
जे होतं नव्याने पाहिलेलं
विचारांच्या खतपाण्यानं
अंकुरत राहिलेलं ...
एक अंतर ....
जे आपल्यातच वाढलेलं
समज गैरसमजांनी
घट्ट गुंतलेलं...
एक ध्यास ....
ज्याने मनाला पछाडलेलं
पूर्ण होण्याआधीच
पूर्णत्वास गेलेलं ...
एक आशा ....
ज्याने बेधुंद बहरलेलं
रित्या मनावर
अधिराज्य गाजवलेलं ...
एक वास्तव ....
जे शाश्वत ठरलेलं
परिवर्तनशील मनाला
जागृत ठेवलेलं ....
एक चित्र ....
जे कलात्मकतेने रंगलेलं
अनेकरंगी छटांनी
अप्रतिम बनलेलं ...
एक प्रवास....
ज्याला मनाने गुंफलेलं
मनाच्या प्रतिबिंबानं
नकळत टिपलेलं....
थोडसं मनात राहिलेलं .....