आयुष्याला सावरावे
आयुष्याला सावरावे
आयुष्य म्हणजे...
उधळण परमेश्वरी कृपेची
उत्कृष्ट कलाकृती त्याच्या,
अनेकविध छटांची!!
सप्ततराणे आयुष्याचे,
नित्य नव्याने बहरावे
आळवूनी राग तयाचे,
आयुष्याला सावरावे!!
आयुष्य म्हणजे...
असे अळवावरील पाणी,
जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांमधली,
निरंतर एक कहाणी!!
असले अल्प आयुष्य तरीही,
कर्तृत्वाने चमकावे
ठेवूनी ठसे सत्कार्याचे,
आयुष्याला सावरावे!!
सुकले जरी फूल तरीही,
सुगंधात त्याच्या उरावे,
हसूनी दुःखातही आपुल्या,
आयुष्याला सावरावे!!!