Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Manjusha Galatage

Others

4  

Manjusha Galatage

Others

परिवर्तन

परिवर्तन

1 min
217


गतिशील काळाचा अंकुश नित्य आहे ,

त्या धावत्या पळाचा संवाद सत्य आहे.

अस्थिर काळासवे आयुष्य निघून गेले ,

विरल्या त्या क्षणांचे सोहळे कैक झाले.


कालानुरूप जगण्यात स्थित्यंतरे कित्येक झाली ,

अलगुज तृप्त स्वर अन् त्या पेटत्या मशाली . 

होते समीप काही ती चीज कालवश झाली,

कल्पनातीत गर्भातली अनेक अंकुरे जन्मास आली.


शांत सागरी मनाच्या उठती अनेक लाटा,

वाटती अनोळखी त्या कालच्याच वाटा.

संभ्रमित जरी दिशा जगण्याची ,

देती प्रत्युत्तर त्यास स्पंदने काळाची.


द्वंद्वातही काळाच्या समतोल ना ढळावा ,

अटळ परिवर्तनाशी नित्य सामना करावा .

बदलता जरी प्रवाह चंचल काळाचा ,

असेल त्यासही शोध असामान्य अस्तित्त्वाचा !!


Rate this content
Log in