लेखणी
लेखणी


साथ तुझी
वाटे हवीशी,
तुझ्यासवे मग
जुळावे मनाशी !!
भाव अंतरीचे
लेखणीने बांधले,
जुळवूनी अक्षरे
कागदावर उमटले !!
सोबती मनाची
असे लेखणी,
भावनांच्या गुंत्याची
शब्दबद्ध आखणी !!
घालते लेखणी
विचारांना साद,
प्रतिध्वनीतून उमटे
स्वर्गीय नाद !!
जुळली माझी
प्रीत तुजसवे,
विरहात तुझ्या
गळतील आसवे !!