आयुष्याला सावरावे
आयुष्याला सावरावे
1 min
232
आयुष्य म्हणजे ....
उधळण परमेश्वरी कृपेची.
उत्कृष्ट कलाकृती त्याच्या,
अनेकविध छटांची !!
सप्ततराणे आयुष्याचे,
नित्य नव्याने बहरावे.
आळवूनी राग तयाचे,
आयुष्याला सावरावे !!
आयुष्य म्हणजे ....
असे अळवावरील पाणी,
जन्म -मृत्यूच्या फेऱ्यांमधली,
निरंतर एक कहानी !!
असले अल्प आयुष्य तरीही,
कर्तृत्त्वाने चमकावे.
ठेवूनी ठसे सत्कार्याचे,
आयुष्याला सावरावे !!
सुकले जरी फूल तरीही,
सुगंधात त्याच्या उरावे,
हसूनी दुःखातही आपुल्या,
आयुष्याला सावरावे !!!