आनंद
आनंद


आत्म्याच्या नंदनवनातील दरवळ,
जीवन प्रवासातील मोहक हिरवळ !!
मानव असतो सदा भुकेला ,
त्या आनंदाच्या परमोच्च क्षणाला !!
जसे काट्याविना शोभा नसे फुलाला ,
तसेच यातनेशिवाय झळाळी नसे आनंदाला !!
इतरांच्या अश्रूंची भाषा ज्यांस उमगली ,
त्यालाच आनंदाची खरी व्याख्या समजली !!
स्वर्ग सुखाची आशाच कशाला ,
विसरू नये कधी माणुसकीला !!
वाहे हृदयी परोपकार संथ ,
त्याचाच खरा अर्थ आनंद !!
आयुष्याला असते लकेर संघर्षाची ,
अपेक्षाभंग , निराशा अन् क्लेशाची !!
यांवर विजयाची ज्यांस खात्री ,
तोच खरा आनंदयात्री !!!