STORYMIRROR

Manjusha Galatage

Others

4  

Manjusha Galatage

Others

बाप

बाप

1 min
248


बाप कुटुंबाचा कणा, बाप कणखर बाणा,

त्याच्या घामातून मिळे,अन्नाचा रोज दाणा .

बाप असे सूत्रधार,लेकरांच्या भविष्याचा ,

त्याच्या कष्टातून होई,उभा पाया आयुष्याचा.


बाप कुटुंबाचं छत्र, देतो पिलांना आधार,

कुटुंबाच्या सुखासाठी , झटतो अपार .

बाप असे फणसा वाणी, काटेरी बाह्यरूप,

अंतरंगात असे त्याच्या, गोड गऱ्यासम रूप.


बापास असे सदा, कर्तव्याचे नित्य भान,

रात्रंदिन असे त्याला, जबाबदारीचे स्मरण .

बाप नारळाचं रूप, कठोर जरी वाणी,

हृदयी वाहे त्याच्या, अमृताहूनी गोड वाणी.


बाप घराचा कळस, सोसतो ऊन वारा,

त्यास काळजी घराची, देतो जागता पहारा.

बाप घराचं मांगल्य, बाप घराचं साफल्य, .

त्याच्या अस्तित्त्वाविना, नाही कशालाच मूल्य !!


Rate this content
Log in